मुंबई : आयसीसीने नुकतेच त्यांचे पुरस्कार जाहीर केले. त्यानंतर लगेच त्यांनी वन डे आणि कसोटी टीमही जाहीर केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही टीमचं नेतृत्त्व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे.


टीम इंडियातून आणखी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे आणि टेस्ट अशा दोन्ही टीममध्ये भारताचे तीन-तीन खेळाडूंचा समावेश आहे. वन डे टीममध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. तर टेस्ट टीममध्ये विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा आणि रवीचंद्रन अश्विनने ११ जणांच्या टीममध्ये स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला वनडे आणि टेस्ट टीमचं कर्णधारपद देण्यात आलंय.


विराटला पहिल्यांदाच ही संधी


विराट कोहलीने २०१७ मध्ये वर्षभर जबरदस्त बॅटींग करत सर्वांनाच अवाक केले. कोहलीच्या याच कामगिरीमुळे त्याला पहिल्यांदाच आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये जागा मिळाली. तसेच त्याला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर हा पुरस्कारही दिला. आयसीसीच्या वनडे टीममध्ये कोहली चौथ्यांदा निवडला गेला आहे. 


आयसीसीची टेस्ट टीम


डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका)


डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)


विराट कोहली (भारत)


स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)


चेतेश्वर पुजारा (भारत)


बेन स्टोक्स (इंग्लंड)


क्विंन्टन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) (विकेटकीपर)


रवीचंद्रन अश्विन (भारत)


मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)


कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)


जेम्स अँडरसन (इंग्लंड)


आयसीसीची वन डे टीम


डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)


रोहित शर्मा (भारत)


विराट कोहली (भारत)


बाबर आझम (पाकिस्तान)


एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका)


क्विंन्टन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) (विकेटकीपर)


बेन स्टोक्स (इंग्लंड)


ट्रेण्ट बोल्ट (न्यूझीलंड)


हसन अली (पाकिस्तान)


राशीद खान (अफगाणिस्तान)


जसप्रीत बुमरा (भारत)