ICC Most Valuable Team : ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने मोठा विषय नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) सोमवारी नुकत्याच पार पडलेल्या T20 World Cup 2022 मधील सर्वोत्तम टीमची (Most Valuable Team) घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या सर्वोत्तम टीममध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि आक्रमक मिडल ऑर्डर फलंदाज सुर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav) नावाचा समावेश आहे. कोहलीला वन डाऊन म्हणजे 3 नंबरचं स्थान दिलंय. तर चौथ्या नंबरवर सुर्याची वर्णी लागली आहे. तसेच टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देखील संघात स्थान देण्यात आलंय. (ICC Most Valuable Team announce virat kohli and suryakumar yadav got place)


हार्दिक पांड्याची निवड12वा खेळाडू म्हणून करण्यात आली आहे. आयसीसीच्या (ICC) या सर्वोत्तम टीममध्ये सहा वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. तर भारताविरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या जॉस बटलर (Jos Buttler) आणि ओपनर अॅलेक्स हेल्सला (Alex Hales) ओपनरचं स्थान देण्यात आलंय. तर सुर्यानंतर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) आणि 6 नंबरवर एकहाती सामना जिंकवणाऱ्या सिकंदर राझाची (Sikandar Raza) वर्णी लावण्यात आली आहे.


आणखी वाचा - Pak vs Eng : इंग्लंडच्या विजया मागचा 'रियल हिरो'! अवघ्या 7 महिन्यात करून दाखवला करिश्मा


दरम्यान, पाकिस्तानचा स्टार स्पिनर शाबाद खान (Shadab Khan), तर इंग्लंडचा फास्टर सॅम करन (Sam Curran) 8 व्या क्रमांकावर आहे. तसेच अॅनरिच नॉरजिया (Anrich Nortje) आणि मार्क वूडला (Mark Wood) संधी देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान बॉलिंग लाईनअपची शान असलेला शाहिन शाह (Shaheen Shah Afridi) आफ्रिदीचा देखील संघात समावेश करण्यात आलाय.