मुंबई : आयसीसीने वनडे रँकिंग (Icc Odi Rankings) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) विराट कोहली (Virat Kohli) फायदा झाला आहे. तर युवा इशान किशनने (Ishan Kishan) मोठी झेप घेतली आहे. इशानने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक तर विराटने शतक ठोकलं होतं. या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी मोठी झेप घेतलीय. विराटला 2 स्थानांचा फायदा झालाय. तर इशान 37 व्या स्थानी पोहचला आहे. (icc odi ranking team india ishan kishan virat kohli shreyas iyer ind vs ban sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट 8 व्या क्रमांकावरुन 6 व्या स्थानी पोहचला आहे. तर इशानने थेट 117 व्या क्रमांकावरुन 37 व्या स्थानी लाँग जंप घेतलीय.  विराटने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 113 तर इशानने 210 धावांची विक्रमी खेळी केली होती.  दुसऱ्या बाजूला मुंबईकर श्रेयस अय्यर 20 व्या क्रमांकावरुन 15 व्या स्थानी आलाय. गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज 26 वरुन 22 व्या स्थानी विराजमान झालाय. 


दरम्यान वनडे सीरिजनंतर आज 14 डिसेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. टीम इंडियाने पहिल्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 278 धावा उभारल्या. टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली.  श्रेयस अय्यर 82 धावांवर नाबाद आहे.


ऋषभ पंतचं अर्धशतक 4 धावांनी हुकलं. पंत 46 धावा करुन माघारी परतला. सलामी जोडी केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 22 आणि 20 धावा केल्या. विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. त्याने 1 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अक्षर पटेल 14 रन्सवर आऊट झाला. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरकडून टीम इंडियाला मोठ्या आणि चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या जोरावर टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठ्या आघाडीची अपेक्षा असणार आहे.