दुबई : भारतीय क्रिकेट संघाकडून 1-4 ने पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ आयसीसी वनडे रॅकींगमध्ये चौथ्या स्थानी घसरला आहे. न्यूझीलंडचा रविवारी वेलिंग्टनमध्ये पाचव्य़ा सामन्यात 35 रनने पराभव झाला. भारताने न्यूझीलंडमध्ये 10 वर्षानंतर ही सिरीज जिंकली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आता 111 गुणांवर आहेत. पण दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. न्यूझीलंडमध्ये सिरीज जिंकल्यानंतर 4-1 ने वनडे सिरीज जिंकल्यानंतर भारताला एका गुणांचा फायदा झाला आहे. भारत या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत 122 अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड या यादीत 126 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यंदाचा वर्ल्डकप हा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे याचा फायदा इंग्लंडला होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिरीज सुरु होण्यापूर्वी भारताकडे 121 गुण तर न्यूझीलंडकडे 113 गुण होते. दक्षिण आफ्रिकेनचा 2-3 ने पराभव झाल्यानंतर पाकिस्तान 102 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 100 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.


वनडे टीम रँकिंग


इंग्लंड -         126


भारत -         122


द.आफ्रिका -  111 


न्यूझीलंड -     111


पाकिस्तान -   102


ऑस्ट्रेलिया -   100 


बांगलादेश -    93


श्रीलंका -         78 


वेस्टइंडिज -    72 


अफगाणिस्तान - 67