2023 Cricket World Cup: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आता 2023 साली आशिया चषक (Asia Cup) पाकिस्तानमध्ये होणार आहे. तर त्यानंतर वनडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद भारताकडे देण्यात आलंय. यजमानपद (Host) असल्याने भारतीय संघाने वर्ल्ड कपसाठी (ICC World Cup 2023) क्वालिफाय झालाय. तर आता अफगानिस्तान संघाला वर्ल्ड कपमध्ये एंट्री मिळाली आहे. (Afghanistan qualified in ICC World Cup 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (AFG vs SL) पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. सामने पावसात वाहून गेल्यानं अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत (World Cup super league table) पाच गुणांची भर पडली त्यानंतर त्यांचे एकूण गुण 115 झालेत. 



सुपर लीगच्या शेवटी अव्वल आठ टीमला वन डे वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. जिथं अफगाणिस्तानला 5 अंकाचा फायदा (Afghanistan Cricket Team) झाला. त्यामुळे आता अफगाणिस्तानचं काम टप्प्यात पार पडलंय. 2023 चा विश्वचषक पुढील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाईल.


आणखी वाचा - Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 SIX, पाहा VIDEO


पाकिस्तानचं काय होणार?


भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) आता मैदानाबाहेर वेगळाच सामना रंगताना दिसतोय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनी भारताला थेट धमकी दिली होती. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर पाकिस्तान पुढील वर्षी भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) खेळणार नाही, असं रमीझ राजा (PCB President) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड कप खेळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.