World Cup 2023 IND vs PAK: आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघादरम्यान खेळवला जाणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार असून या हाय व्होल्टाज सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तान संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकत स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. हा सामना कोण जिंकणार हे शनिवारीच स्पष्ट होईल. पण तुम्हाला माहित आहे का भारत-पाकिस्तान संघादरम्यान पहिला सामना कधी खेळवला गेला होता. आणि हा सामना कोणता संघ जिंकाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहास
भारत आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेटमधला पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात. भारत-पाकिस्तानदरम्यान प्रत्येक सामना चुरशीचा होतो, पण दोनही देशांमधील राजकीय संबंध बिघडण्यानंतर गेल्या सात वर्षात हे दोन्ही संघ केवळ आयीसी स्पर्धेत एकमेकांसमोर आले आहेत. पण क्रिकेटचा इतिहास पाहिला तर भारत-पाकिस्तानदरम्यानचा पहिला सामना 1952 साली खेळवण्यात आला. हा कसोटी सामना होता. तर 1978 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. क्वेटामध्ये हा सामना रंगला होता. पहिली कसोटी आणि पहिला एकदिवसीय सामना जिंकण्याचा मान भारताला जातो. 


भारत-पाकिस्तान पहिला कसोटी सामना
टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना लाला अमरनाथ (Lala Amernath) यांच्या नेतृत्वाखाली खेळला. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करत 372 धावा केल्या. विजय हजारे यांनी  76 धावा केल्या होत्या तर विजय मांजेरकर यांनी 23 आणि हेमू अधिकारी यांनी सर्वाधिना नाबाद 81 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताचा पहिला डाव 150 आणि दुसरा डाव 152 धावांवर आटोपल होता. त्यावेळी पाकिस्तन संघाचे कर्णधार होते अब्दुल करदार.


भारत-पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना 
कसोटी विजयानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामनाही जिंकला होता. भारत-पाक पहिला एकदिवस सामना 1978 मध्ये पाकिस्तानच्या क्वेटा मध्ये खेळवला गेला. टीम इंडियाने पहिली फलंदाज करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 170 धावा केल्या. मोहिंदर अमरनाथ यांनी 51 धावांची शानदार खेळी केली होती. तर दिलीप वेंगसरकर यांनी 34 आणि सुरिंदर अमरनाथ यांनी 37 धावा केल्या होत्या. पाकिस्तानाच संघ 166 धावांव ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून माजिद खान यांनी सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या.


भारत-पाकिस्तान कामगिरी
तेव्हापासून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान 134 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यात टीम इंडियाने 56 सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तानने 73 सामन्या बाजी मारलीय.


भारत-पाकिस्तान विश्वचषक कामगिरी
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. 1992 विश्वचषकात या दोनही संघात पहिल्यांदाच सामना रंगला. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानदरम्यान सामना खेळवला गेला. या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारलीय आहे.


भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.


पाकिस्तान संघ
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक