WC 2023 Opening Ceremony: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. यंदा विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा (Openign Ceremony) होणार नाहीए. स्पर्धेच्या एक दिवस आधी म्हणजे 4 ऑक्टोबरला भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचे कर्णधार एकमेकांना भेटतील आणि फोटो सेशन (Photo Session) होईल. त्यानंर एक लेजर शो होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा होणार नाहीए. 4 ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार असल्याचं बोललं जात होतं. यात भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं दर्शन घडवलं जाणार होतं. तसंच बॉलिवूड स्टार रणवीर सिंह, तमन्ना भाटिया, गायक अरिजीत सिंह, श्रेया घोषाल आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा कार्यक्रम होणार होता. पण कार्यक्रम आता होणार नसल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआयने (BCCI) अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


पण मिळालेल्या माहितीनुसार उद्घाटन सोहळ्याऐवजी स्पर्धेचा सांगता समारोह भव्य करण्याचा बीसीसीायचा विचार आहेत. 19 नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तसच 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याचीही शक्यता आहे. 


विश्वचषक स्पर्धेपूर्वी वाद
विश्वचषक स्पर्धेपूर्वी काही गोष्टींवरुन वाद निर्माण झाला होता. सर्वात आधी विश्वचषचकाच्या वेळापत्रकाबाबत संभ्रम होता. त्यानंतर सामना खेळवण्याच्या ठिकणांवरुन वाद झाला. वेळापत्रक आणि स्टेडिअममध्ये काही बदल करण्यात आला. त्यानंतर तिकिट घोटाळा झाल्याची टीका झाली. हे वाद थांबत नाही तोच आता उद्घाटन सोहळा रद्द केल्याची चर्चा आहे. 


5 ऑक्टोबरला पहिला सामना
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये रंगणार असून गतविजेती इंग्लंड आणि उपविजेती न्यूझीलंडची टीम आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर अकरा ऑक्टोबरला नेदरलँडबरोबर तर 14 ऑक्टोबरला पाकिस्तानबरोबर टीम इंडिया दोन हात करेल. 


46 दिवस स्पर्धा
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्ंहेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. तब्बल 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना चुरशीच्या सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.