दुबई : कोणत्याही क्रिकेट स्पर्धेआधी टीमच्या कर्णधारांसोबत ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम होतो. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजआधीही अशाच प्रकारे ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. पण या ट्रॉफीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल करण्यात येत आहे. या ट्रॉफीच्या वर एक बिस्कीट लावण्यात आलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख प्राजोयक बिस्कीटाची कंपनी असल्यामुळे ट्रॉफीच्या वर हे बिस्कीट लावण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॉफीवर बिस्कीट लावण्यात आलं असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. खुद्द आयसीसीनंही ट्विटरवरून पीसीबीला चिमटा काढला. तुम्ही विरुद्ध ट्रॉफी, चिंता करण्याची काहीही गरज नाही, असं ट्विट आयसीसीनं केलं.



पाकिस्तानी क्रिकेट समर्थक आणि क्रीडा पत्रकारांनी आयसीसीच्या या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड अशाप्रकारे एखाद्या क्रिकेट बोर्डाची मस्करी कशी करू शकतं, असे सवाल पाकिस्तानी क्रिकेट फॅननी उपस्थित केले.


आयसीसीच्या या ट्विटला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही ट्विटरवरून उत्तर दिलं.



पाकिस्तानच्या या ट्विटनंतरही त्यांच्यावर यूजर्सनी पुन्हा निशाणा साधला.



पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ४ दिवसानंतर रिप्लाय केल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं.



ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये पाकिस्तानचा ११ रननी विजय झाला. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये पाकिस्तानला २-० ची आघाडी मिळाली आहे. पाकिस्ताननं पहिले बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १४७ रन केले. यानंतर ऑस्ट्रेलियाला ८ विकेट गमावून १३६ रनच करता आले. इमाद वसीनं शानदार बॉलिंग केल्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.