COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल आणि बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल पुन्हा एकदा आमने सामने आलेत. यावेळी कारण आहे ते म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१.


वनडे फॉरमॅटममध्ये दर चार वर्षांनी होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मिनी वर्ल्डकप म्हटले जाते. बातमीनुसार, २०२१मध्ये भारतात होणारी ही स्पर्धा  ५०-५० षटकांच्या ऐवजी २०-२० षटकांची खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. मात्र याला बीसीसीआयने कडाडून विरोध केलाय.


टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार फेब्रुवारीमध्ये आयसीसीची मीटिंग झालीय. यावेळी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी बोर्डाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची टी-२० खेळवण्याची इच्छा होती.


करसवलतीच्या मुद्द्यावरुन आयसीसीने २०२१ साली होणारी ही स्पर्धा भारताबाहेर नेण्याची तयारी सुरु केली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतले सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यासाठी बीसीसीआयने नकार दिलाय. तसेच भविष्यात असे काही झाल्यास तेव्हाही बीसीसीआयटचा विरोध असेल असे अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.