ICC Ranking : भारतासाठी `कभी खुशी कभी गम`; Shubman Gill ची रँकिंगमध्ये मोठी झेप!
ICC ODI Ranking : नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी शुभमन गिलची बॅट देखील गरजली. शेवटच्या 6 वनडे डावांमध्ये गिलने 2 शतक आणि 1 डबल सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान शुभमनला त्याच्या या खेळाची आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला.
ICC ODI Ranking: नुकतंच आयसीसी वनडे रँकिंग अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्का बसला आहे, तर काही खेळांडूंचं नशीब फळफळलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) ने वनडे रँकिंगमध्ये मोठी घेप घेतली असून टॉप 5 मध्ये त्याचा समावेश झाला आहे. मात्र यावेळी मोहम्मद सिराजला मोठा धक्का बसला आहे.
ICC ODI Ranking मध्ये मोहम्मद सिराजचा पहिला क्रमांक हिसकावण्यात आला आहे. सिराज नंबर वनवरून थेट नंबर 3 वर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यांनंतर सिराजला हा मोठा धक्का बसला आहे.
शुभमनने रोहित-विराटला टाकलं मागे
नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी शुभमन गिलची बॅट देखील गरजली. शेवटच्या 6 वनडे डावांमध्ये गिलने 2 शतक आणि 1 डबल सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान शुभमनला त्याच्या या खेळाची आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला. यावेळी त्याने थेट टॉप-5 मध्ये धडक मारलीये. विराट आणि रोहित शर्मालाही त्याने मागे टाकलं असून हे दोघं 8 व्या आणि 9 व्या स्थानावर आहेत. टॉप-5 मध्ये असलेला शुभमन एकमेव भारतीय फलंदाज आहे.
जोश हेजलवुड बनला नंबर 1 गोलंदाज
न्यूझीलंडच्या सिरीजनंतर मोहम्मद सिराज गोलंदाजीमध्ये नंबर-1 गोलंदाज बनला होता, मात्र आता त्याची जागा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुडने घेतली आहे. सध्याच्या स्थितीत हेझलवुड नंबर 1 गोलंदाज आहे. तर सिराज थेट नंबर 3 वर पोहोचला आहे.
टेस्ट रँकिंगमध्ये विलियम्सनचा दबदबा
श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टेस्ट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन चांगला फॉर्ममध्ये दिसून आला. एक सेंच्युरी आणि एक डबल सेंच्युरी मारत त्याने दोन्ही सामने न्यूझीलंडला जिंकवून दिला. दरम्यान याचा फायदा केनला टेस्ट रँकिंगमध्येही झाला. केनने 4 क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पहिल्या क्रमांकावर मार्नस लाबुशेन आहे. भारताकडून टॉप 10 मध्ये केवळ एका फलंदाज असून तो ऋषभ पंत आहे.