दुबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेची (Icc t 20 world 2021) सांगता झाली आहे. क्रिकेट विश्वाला 45 सामन्यानंतर नवा विश्व विजेता मिळाला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर (New zealand) 8 विकेट्सने मात करत ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कपवर मात केली. यानंतर आता आयसीसीने टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम टीम निवडली आहे. (ICC selected the best team of T 20 World cup Babar Azam captain not a single Indian included)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने निवडलेल्या या टीमच्या कॅप्ट्न्सीची जबाबदारी पाकिस्तानच्या बाबर आझमला देण्यात आली आहे. आयसीसीने एकूण 12 खेळाडू निवडले आहेत. तर आश्चर्याची बाब म्हणजे या संघात टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.


आयसीसीने निवडलेल्या सर्वोत्तम संघातील खेळाडू 


डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया - 289 धावा


जॉस बटलर, इंग्लंड - 269 धावा


बाबर आझम, पाकिस्तान - 303 धावा
 
चरिथ असालंका, श्रीलंका - 231 धावा


एडन मर्करम, दक्षिण आफ्रिका-162 धावा  


मोईन अली, इंग्लंड - 92 धावा आणि 7 विकेट्स 


वी हसरंगा, श्रीलंका - 16 विकेट्स 


एडम झॅम्पा, ऑस्ट्रेलिया - 13 विकेट्स


जोश हेझलवूड, ऑस्ट्रेलिया - 11 विकेट्स


ट्रेन्ट बोल्ट, न्यूझीलंड - 13 विकेट्स


एनरिक नॉर्किया, दक्षिण आफ्रिका - 9 विकेट्स 


शाहिन आफ्रिदी, पाकिस्तान- 7 विकेट्स (12 वा खेळाडू)


आयसीसीच्या एका निवड समितीने ही टीम निवडली आहे. या निवड समितीमध्ये इयॉन बिशप, ए जर्मेनॉस, शेन वॉटसन, एल बूथ, शाहिद हाशमी यांच्यासह अन्य महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता.
 
टीम इंडियाचा एकही खेळाडू नाही


आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीच्या या निवड समितीने या 12 खेळाडूंच्या संघात एकाही भारतीयाला संधी दिलेली नाही. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. तर बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या खेळाडूला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.