मुंबई : टी 20 वर्ल्ड कपचा T20 World Cup 2021 Final) अंतिम सामना रविवारी 14 नोव्हेरंबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध  न्यूझीलंड (New Zealand vs Australia) यांच्यात लढत रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Dubai Cricket Stadium) स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. (icc t 20 world cup 2021 final match New Zealand vs Australia can win 1st   t 20 world cup title)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत इतिहास रचला जाणार आहे. क्रिकेट विश्वाला या अंतिम सामन्यात नवा विश्व विजेता मिळणार आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र इंग्लंडने 7 विकेट्सने विजय मिळवत वर्ल्ड कप मिळवला होता.


टी 20 वर्ल्ड कपमध्ये 5 संघांनी वर्ल्ड कप जिंकला आहे. वेस्टइंडिजने सर्वाधिक २ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेने प्रत्येकी 1 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पहिल्या टी 20 वर्ल्ड कपची वाट पाहत आहे. मात्र यावेळेस या दोघांपैकी एक संघ विश्व विजेता ठरणार आहे.


वर्ल्ड कप आणि विजेता संघ  (ICC Men’s T20 World Cup Winners Team)


टीम इंडिया -  2007 


पाकिस्तान - 2009


इंग्लंड - 2010 


वेस्टइंडिज - 2012


श्रीलंका - 2014


वेस्टइंडिज - 2016


न्यूझीलंडला सुवर्णसंधी


न्यूझीलंडने याच वर्षी जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत टीम इंडियाचा पराभव करत टेस्टमधील वर्ल्ड कप जिंकला होता. आता न्यूझीलंड टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचली आहे. त्यामुळे किवींना हा अंतिम सामना जिंकून एकाच वर्षात आयसीसीच्या दोन्ही स्पर्धेचं विजेतपद मिळवण्याची संधी आहे. 


विशेष म्हणजे न्यूझीलंडची 3 वर्षात आयसीसीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.