मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात लहान ग्राऊंडमध्ये खेळणं टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांना महागात पडलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2021) मोठ्या मैदानात सामने खेळवण्यात आले, तेव्हा भारतीय फलंदाजांना चौकार मारणंही शक्य झालं नाही त्यामुळे ते आऊट झाले, असं म्हणनं आहे टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचं. आयपीएलमध्ये सातत्याने खेळलल्याने टीम इंडियाचे खेळाडू हे थकलेले आहेत. त्याचा थेट परिणाम हा मैदानातील कामगिरीतून दिसून येत आहे, असंही वेंगसरकर म्हणाले. (icc t 20 world cup 2021 former team indian crickter on team india) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या अपयशासाठी आयपीएल जबाबदार? 


टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरीसाठी तुम्ही आयपीएलला जबाबदार मानता का, असा प्रश्न वेंगसरकर यांना विचारण्यात आला. यावर वेंगसरकर म्हणाले की, "असं नाहीये की हे सर्व आयपीएलमुळेच झालंय. फलंदाज आणखी जबाबदारीने खेळू शकले असते. आता फार वेळ नाहीये. उर्वरित सामन्यांमध्ये खेळाडूंना सकारात्मक पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे".
 
यूएईच्या परिस्थितीशी खेळाडू एकरुप 


टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्याचं आयोजन हे ओमानसह यूएईमध्ये करण्यात आलं आहे. यूएईतील शारजाह, दुबई आणि अबुधाबी या स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते. आयपीएलमध्ये खेळलल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना यूएईतील परिस्थितीची माहिती होती. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.