मुंबई : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज सुनील गावसकर यांनी टी 20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध एकाच कारणामुळे पराभवाचा सामना करायला लागल्याचं सांगितलंय. टीम इंडियाने या महत्त्वाच्या दोन्ही सामन्यात धावा केल्या नसल्याने पराभव झाल्याचं गावसकरांनी सांगितलं. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. यामुळे टीम इंडिया 2007 नंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत बाद फेरीपर्यंत पोहचू शकली नाही. टीम इंडियाने पावर प्लेमध्ये आपला खेळ बदलावा, अशी विनंतीही गावसकरांनी केली आहे. (icc t 20 world cup 2021 littile master Sunil Gavaskar told why India had to face defeat against Pakistan and New Zealand)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावसकर काय म्हणाले?


"ज्या प्रकारे पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना बांधून ठेवलं. त्यांना फटकेबाजी करुन दिली नाही, याच कारणामुळे टीम इंडियाला अधिक धावा करता आल्या नाहीत. दवामुळे (Due Factor) दुसऱ्या डावात बॅटिंग करणं सोपं होतं, कारण बॉल स्वींग होत नव्हता आणि फिरकी गोलंदाजांनी टाकलेला चेंडू सरळ दिशेने जात होता. दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याचा फायदा होता. मात्र जर तुम्ही 180 धावा केल्या असत्या तर गोलंदाजांना आव्हानाचं बचाव करण्यासाठी 20-30 अधिक धावा मिळाल्या असत्या. जेव्हा तुम्ही न्यूझीलंड विरुद्ध 111 धावा करता तेव्हा ड्यू फॅक्टर महत्त्वाचा ठरत नाही. आम्ही धावा केल्या नाहीत, हेच प्रमुख कारण आहे, आणखी काही कारण नाही", असं गावसकरांनी म्हंटलं. ते स्पोर्ट्स तकसोबत बोलत होते. 


गावसकर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याच्या बाजूने नाहीत. त्यांनी टीम इंडियाने पावर प्लेमध्ये दृष्टीकोन बदालायला हवा, असं म्हंटलं. "मला नाही वाटतं टीममध्ये मोठे बदल केल्याने काही फरक पडेल. तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. पावर प्लेच्या ओव्हरचा पूरेपूर फायदा घ्यायला हवा. मात्र तेच टीम इंडियाला मागील वर्ल्ड कप स्पर्धेत जमलं नाही. खरंतर पहिल्या 6 ओव्हरमध्ये 30 यार्ड सर्कलत्या बाहेर 2 खेळाडू असतात. टीम इंडियाने आयसीसीच्या मागील काही स्पर्धांमध्ये याचा लाभ घेतला नाही", असं गावसकरांनी नमूद केलं. 


"जेव्हा टीम इंडियाचा सामना चांगले गोलंदाज असलेल्या मजबूत संघाविरुद्ध झाला आहे, तेव्हा टीम इंडिया जास्त धावा करु शकलेली नाही. यामध्ये बदल आवश्यक आहे", असं गावसकरांनी स्पष्ट केलं. तसंच टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीचं दुसरं कारण म्हणजे खराब फिल्डिंग. "दुसरं आणि महत्तवपूर्ण, संघात असे खेळाडू हवेत जे फिल्डिंगमध्ये माहिर आहेत. न्यूझीलंडने ज्या प्रकारे फिल्डिंग, धावा वाचवल्या, कॅचेस घेतल्या, ते फार महत्तवपूर्ण आहे", असं लिटील मास्टर यांनी स्पष्ट केलं.