T20 World Cup | सेमीफायनलमध्ये हे 4 संघ भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील (T 20 world cup 2021) पहिला सेमी फायनलचा सामना हा 10 तर दुसरा सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
यूएई : टी 20 वर्ल्ड कप 2021 (T 20 World Cup 2021) मधील रविवारचा दिवस (7 नोव्हेंबर) टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांना कधीही विसरता येणार नाही. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्याने टीम इंडिया स्पर्धेबाहेर झाली. तर न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये (Semi Final) पोहचणारी चौथी टीम ठरली. न्यूझीलंड विजयासह सेमी फायनलचं सर्व चित्र स्पष्ट झालं. (icc t 20 world cup 2021 pakistan australia england and new zeland are qualified to semi final)
हे 4 संघ भिडणार
टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 4 संघांनी धडक मारली आहे. पहिला सेमी फायनलचा सामना हा 10 तर दुसरा सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
सेमीफायनलचं वेळापत्रक
पहिला सामना, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, 10 नोव्हेंबर
दुसरा सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 11 नोव्हेंबर
दरम्यान टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्याने क्रिकेट चाहते नाराज आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 2012 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाच्या आशा अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावर होत्या. मात्र अफगाणिस्तानचा पराभूत झाल्याने टीम इंडियाच्या होत्या नव्हत्या त्या सर्व आशा धुळीस मिळाल्या.