दुबई : न्यूझीलंडवर (New Zealand) अंतिम सामन्यात 8 विकेट्सने मात करत ऑस्ट्रेलिया (Australia) टी 20 वर्ल्ड कप 2021 (T 20 World Cup 2021) चॅम्पियन ठरली. टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ ठरली. एरॉन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वात कागांरुनी ही कामगिरी केली. हा टी 20 वर्ल्ड कप जिंकताच ऑस्ट्रेलियाने 8 व्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकणारी पहिलीच टीम ठरली आहे. (icc t 20 world cup final 2021 australia win 8 th title of icc trophy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा खिताब आपल्या नावे केला होता. यानंतर आता कांगारुंनी पहिला वहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. ऑस्ट्रेलियाने एकूण 8 वेळा आयसीसीचं विजेतेपद पटकावलं आहे. तर त्यानंतर टीम इंडिया आणि वेस्टइंडिजने प्रत्येकी 5 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.


या अंतिम सामन्यात पहिले बॅटिंग करत न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 173 धावांचं आव्हान मिळालं. कांगारुंनी हे आवहान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. विशेष म्हणजे आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाचा कधीच पराभव करता आलेला नाही. न्यूझीलंडने या अंतिम सामन्यातही पराभवाची मालिका कायम ठेवली.


आयसीसीच्या बाद फेरीत किंवीं विरुद्ध कांगारुच वरचढ


1996 वर्ल्ड कप - ऑस्ट्रेलिया विजयी.


2006 चॅम्पियनशीप ट्रॉफी - ऑस्ट्रेलिया विजयी.


2009 चॅम्पियनशीप ट्रॉफी - ऑस्ट्रेलिया विजयी.


2015 वर्ल्ड कप - ऑस्ट्रेलिया विजयी.


2021 टी 20 वर्ल्ड कप - ऑस्ट्रेलिया विजयी.


ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन


ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कप 2010 मध्ये फायनलमध्ये पोहचली होती. मात्र त्यांचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. मात्र यावेळेस ऑस्ट्रेलियाने ही उणीव भरुन काढली. न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली.  


टी 20 वर्ल्ड कप जिंकणारे संघ 


टीम इंडिया - 2007


पाकिस्तान - 2009


इंग्लंड - 2010


वेस्टइंडिज - 2012 


श्रीलंका - 2014


वेस्टइंडिज - 2016 


ऑस्ट्रेलिया -  2021