मुंबई : टीम इंडियाचा (Team India) बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा चमकला आहे. आयसीसीने नुकतीच टी 20 रँकिंग (ICC T20 Ranking) जाहीर केली आहे. सूर्याने या रँकिंगमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवलंय. सूर्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात धमाका केला होता. सूर्याने अवघ्या 36 बॉलमध्ये  69 रन्स ठोकल्या होत्या. सूर्याला या खेळीचाच फायदा झालाय.  सूर्यासोबतच विराट कोहलीला फायदा झालाय. तर रोहित शर्माने आपलं स्थान कायम राखलंय. (icc t20 rankings team india sky suryakumar yadav climbs to no 2 position batter rankings rohit sharma virat kohli)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याने पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला पछाडत दुसरं स्थान मिळवलंय. ताज्या आकडेवारीनुसार, सूर्याचे सध्या एकूण 801 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. सूर्याने हैदराबादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात विजयी खेळी साकारली. भारताने या जोरावर 2-1 ने मालिका जिंकली. सूर्याने याआधी ही दुसरं स्थान पटकावलं होतं. सूर्याने ऑगस्टमध्ये विडिंज विरुद्ध शानदार कामगिरी करत दुसरं स्थान मिळवलं होतं. 


विराटला फायदा-रोहितचं स्थान कायम


सूर्याव्यतिरिक्त टीम इंडियाचा कॅप्टन रोहितने आपलं स्थान कायम राखलंय. तर विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झालाय. रोहित 13 व्या स्थानी कायम आहे. तर विराट 15 व्या क्रमांकावर पोहचलाय. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यात अनुक्रमे 11, 46 आणि 17  धावा केल्या होत्या.