Virat Kohli ICC T20I Ranking : भारताचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतलाय. कोहलीने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावलं . त्याचबरोबर संपूर्ण आशिया चषक स्पर्धेतही (Asia Cup 2022) त्याने आपला जलवा कायम ठेवला. विराटला याच कामगिरीचा फायदा झालाय. या कामगिरीमुळे विराटला टी 20 वर्ल्ड कपआधी मोठी गुडन्यूज मिळालीय. (icc t20i ranking team india virat kohli jump on 15th spot after asia cup 2022 afghanistan 1st t20i hundred)
 
कोहलीला ICC T20 क्रमवारीत ( ICC T20I Ranking) बंपर फायदा झालाय. विराटने 14 स्थानांची झेप घेत 15व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत एकूण 276 धावा केल्या.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
विराटने त्‍याच्‍या टी-20 करिअरमधील पहिले शतक झळकावलं. कोहलीने हे शतक आशिया कपमध्ये अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Team) विरुद्ध केलं. यासह विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा संयुक्तरित्या दुसरा क्रिकेटपटू ठरलाय.


भुवनेश्वरला फायदा


कोहलीशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही (Bhuvneshwar Kumar) फायदा झाला आहे. भुवीने आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय अन्य काही सामन्यांमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे भुवीला 4 ठिकाणी फायदा झाला. त्याने सातव्या क्रमांकावर कब्जा केला आहे.