R Ashwin And Shreyas Iyer ICC Latest Test Rankings : बांगलादेश विरूद्धचे दोन कसोटी सामने टीम इंडियाने (Team India) 2-0 ने जिंकले आहेत. टीम इंडियाच्या या विजयाचे अनेक शिल्पकार आहेत. या शिल्पकारांच्या सामन्यातील कामगिरीनंतर आता त्यांना टेस्ट रँकिंगमध्ये (Test Rankings) मोठा फायदा झाला आहे. या खेळाडूंमध्ये ऑलराऊंडर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि स्पिनर रविचंद्रन अश्विनचा (R Ashwin) समावेश येतो. या खेळाडूंना टेस्ट क्रमवारीत काय फायदा झाला आहे ? हे ताज्या आकडेवारीतून जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना मोठा फायदा झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 


अश्विनची दुसऱ्या स्थानी झेप 


बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सामन्यात 6 विकेट घेणारा रविचंद्रन अश्विन जसप्रीत बुमराहसह गोलंदाजांमध्ये संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यासोबतच त्याने दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या होत्या. या धावांच्या मदतीने तो फलंदाजांच्या क्रमवारीत 84 व्या स्थानावर पोहोचलाय. रवींद्र जडेजा 369 रेटिंग गुणांसह अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) 343 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. 


बॅटींगमध्ये श्रेयस अय्यरची कमाल


बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कारकिर्दीतील सर्वोत्तम 16व्या क्रमांकावर पोहोचला. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द सिरीज असूनही चेतेश्वर पुजारा 3 स्थानांनी घसरून 19व्या स्थानावर आहे. विराट कोहली 2 स्थानांनी घसरून 14व्या स्थानावर आहे.फलंदाजांमध्ये ऋषभ पंत सहाव्या तर गोलंदाजांमध्ये उमेश यादव ३३व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा फलंदाज लिटन दास कारकिर्दीतील सर्वोत्तम 12व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर मोमिनुल हक 68व्या, झाकीर हसन 70व्या आणि नुरुल हसन 93व्या स्थानावर आहे.


दरम्यान बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळली होती. त्याने पहिल्या डावात 105 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 2 षटकार आले होते. त्याचवेळी श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावात 46 चेंडूंचा सामना करत नाबाद 29 धावा केल्या होत्या. या धावांचा त्याला टेस्ट रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.