दुबई : आयसीसीने टेस्ट रॅकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांना आपलं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. टीम इंडियाचे या खेळाडूंना टॉप-10 मध्ये आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेत. (icc test rankings team india captain rohit sharma and virat kohli constant on his number r ashwin jasprit bumrah)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी क्रमवारीत कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आठव्या स्थानी आहे. विराट कोहली (Virat Kohli) 10 व्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलिंग रॅंकिगमध्ये आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑलराउंडर यादीत रवींद्र जाडेजाने अव्वल स्थान कायम राखलंय. 


टेस्ट रॅकिंगमध्ये बांगलादेशचा बॅट्समन लिटन दास आणि श्रीलंकेच्या एंजलो मॅथ्यूजला फायदा झाला आहे. लिटन 17 व्या तर मॅथ्यूज 21 व्या स्थानी पोहचला आहे.


या दोघांनी अनिर्णित राहिलेल्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे.


रॅंकिगमध्ये कोण कुठे? 


बॅट्समन रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन मार्नस लाबुशेन 892 रेटिंग्ससह अव्वल स्थानी आहे. तर स्टीव्ह स्मिथ 845 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. केन विल्यमसन 844 गुणांसह तिसर्‍या, जो रुट 843 गुणांसह चौथ्या आणि बाबर आझम 815 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 


गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स 901 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी विराजमान आहे. अश्विन 850 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 830 गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी 827 गुणांसह चौथ्या आणि न्यूझीलंडचा काइल जेमिसन 820 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.