मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडबाबत उल्लेख करताना आयसीसीने मोठी चूक केली. यानंतर भारतीयच नाही तर जगभरातले क्रिकेटप्रेमी आयसीसीवर चांगलेच भडकले. आयसीसीने त्यांच्या वेबसाईटच्या हॉल ऑफ फेम पेजवर राहुल द्रविडचा डावखुरा बॅट्समन असा उल्लेख केला. पण चाहत्यांनी कठोर शब्दात टीका केल्यानंतर आयसीसीने ही चूक सुधारली आहे.






COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांनी ट्विटरवरून सुनावल्यानंतर मात्र आयसीसीने त्यांची ही चूक सुधारली आहे. 


मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल द्रविडचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे यांच्यानंतर हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.


२ जुलै २०१८ साली राहुल द्रविड आणि रिकी पाँटिंग यांना हॉल ऑफ फेम देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. पण द्रविड याला हा पुरस्कार सुनिल गावसकर यांच्याहस्ते वेस्ट इंडिजविरुद्धच्या थिरुवनंतपुरममध्ये देण्यात आला.


राहुल द्रविडने १६४ टेस्टमध्ये ३६ शतकांसह १३,२८८ रन आणि ३४४ वनडेमध्ये १२ शतकांसह १०,८८९ रन केले. यावर्षी जुलै महिन्यात सचिन तेंडुलकर याचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे हा मान पटकवणारा सचिन हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. खेळाडूने निवृत्ती घेतल्याच्या ५ वर्षानंतर तो हॉल ऑफ फेम पुरस्कारासाठी पात्र होतो. 


सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने टेस्टमध्ये १५,९२१ रन आणि वनडेमध्ये १८,४२६ रन केले तसंच १०० शतकंही केली. हा विक्रम करणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे.