ख्राईस्टचर्च :  ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम (Australia Women Cricket Team) सातव्यांदा  वर्ल्ड चॅम्पियन ठरली (ICC Womens World Cup 2022) आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा (England Women) अंतिम सामन्यात 71 धावांनी पराभव केला आहे. यासह कांगारुंनी वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. अलिसा हिली (Alyssa Healy) ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. (icc womens world cup 2022 final aw vs ew australia women beat england women team by 71 runs and win world cup) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 357 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड 43.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. इंग्लंडकडून नताली सिवरने सर्वाधिक नॉट आऊट 148 धावांची खेळी केली.  ऑस्ट्रेलियाकडू जेस जोनासेन आणि अलाना किंगने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 


याआधी इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. एलीसाच्या 170 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावून 356 धावांचा डोंगर उभा केला. 


एलीसाला 41 धावांवर खेळताना जीवनदान मिळालं. एलीसाने या संधीचं सोनं केलं आणि मोठी खेळी साकारली. एलीसाने 138 बॉलमध्ये 26 चौकारांसह 170 धावा केल्या.