ख्राइस्टचर्च : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट (Austraia Womens Team) टीमने अंतिम सामन्यात इंग्लंड (England Womens) पराभूत करत वर्ल्ड कप (Womens World Cup 2022) जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. वर्ल्ड कपच्या या फायनलमध्ये ऐलिसा हेली (Alyssa Healy) विजयाची नायिका ठरली. ऐलिसाने 170 धावांची खेळी केली. या खेळीसह एलिसाने दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. यासह एलिसाने अनेक रकॉर्ड आपल्या नावावर केलं. (icc world cup 2022 australia alyssa healy scored 170 and braek more record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिसाने  138 बॉलमध्ये 26 चौकारांसह 170 धावा केल्या. एलिसाने यासह महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढला. हा विक्रम आधी ऑस्ट्रेलियाच्या करेन रोल्टेनच्या नावावर होता. करेनने  2005 मध्ये टीम इंडिया विरुद्ध अंतिम सामन्यात 107 रन्सची खेळी केली होती.


वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा


एलिसा महिला एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. एलिसाने 509 धावा केल्या. तसेच राचेल हेन्स या सामन्यात 68 धावा केल्या. या खेळीसह राचेल या स्पर्धेत 497 धावा करणारी दुसरी फंलदाज ठरली. 


हीली आणि हेन्स या दोघींनी 1997 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची कॅप्टन डेबी हॉकलीचा 456 रन्सचा रेकॉर्ड ब्रेक केला. हीली महिला वर्ल्ड कपच्या एका स्पर्धेत 500 धावा करणारी पहिली बॅट्समन ठरली.