ICC World Cup 2023 India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय सामन्यात आज भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने उभे ठाकलेत. महत्त्वाच्या सामन्यात भारत टॉस का बॉस (India Won Toss) ठरलाय. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे सलामीचा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) टीम इंडियात एन्ट्री झालीय. डेंग्यूच्या आजारामुळे शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला असून पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात केली. गिलच्या समावेशामुळे ईशान किशनला (Ishan Kishan) बाहेर बसावं लागेल. हा एक बदल वगळता भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सट्टेबाजांची सामन्यावर नजर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर सट्टेबाजांचीही नजर या सामन्यावर आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागल्याची माहिती आहे. या सामन्यासाठी भारताचं पारडं जड आहे. भारतावर 60 पैसे भाव आहे. तर पाकिस्तानवर 1.40 पैसे रेट सुरु आहे. 


भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सट्टेबाजांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सट्टेबाजारात टीम इंडियाला पहिली पंसती देण्यात आली आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयी होईल असा अंदाज वर्तवा जात आहे. विश्वचषकातील कोणत्याही एका सामन्यावर लागलेला हा रेकॉर्डब्रेक सट्टा आहे. सट्टेबाजांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झालीय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजांचं प्रमुख केंद्र यावेळी दुबई आणि श्रीलंका आहे. भारतात विश्वचषक स्पर्धा होत असल्यने पोलिसांची सर्व ठिकाणांवर नजर आहे. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सट्टेबाजारांनी भारताबाहेरुन सट्टा सुरु केला आहे. 


भारत पहिली पसंत
विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धु्व्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला धुळ चारली. फलंदाजी आणि गोलंदाजीत भारत अव्वल ठरतो. त्यातच स्पर्धा भारतात होत असल्याने टीम इंडियाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाची कामगिरी दमदार होतेय. शिवाय यंदा विश्वचषक जेतेपदासाठी भारतीय संघाला दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे टीम इंडिया सट्टेबाजारांची पहिली पसंती आहे. 


पाकिस्तान संघानेही स्पर्धेतील दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानाने नेदरलँडचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेता पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानने 345 धावांचं आव्हान पूर्ण केलं. पाकिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी त्यांच्या गोलंदाजी लौकिकाला साजेशी दिसत नाहीए. त्यातच नुकत्याच झालेल्या एशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्ताननला धुळ चारली होती. त्यामुळे सट्टेबाजांनी पाकिस्तानला जास्त भाव दिलेला नाही.


भारतीय संघ
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज