Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, `या` खेळाडूला संधी
India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
India vs Pakistan Playing 11 in World Cup 2023 Ahmedabad : विश्वचषक स्पर्धेत सलग दोन विजय मिळवल्यानंतर टीमं इडिया (Team India) आता विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झालीय. शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला भारत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) दोन हात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी 1 लाख 30 हजार प्रेक्षक क्षमतेचं स्टेडिअम हाऊसफूल झालं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) काही बदल होण्याची शक्यता आहे.
डेंग्यूच्या आजारातून बरा झालेला शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. पण चांगली गोष्ट म्हणेज शुभनन गिलने सराव सुरु केला आहे. गिलऐवजी संघात संधी मिळालेल्या ईशान किशनने पहिल्या सामन्यात शुन्य तर दुसऱ्या सामन्यात 47 धावा केल्या. पण त्याच्या खेळीत आत्मविश्वास जाणवत नाही. पण गिलही तिसऱ्या सामन्यातही खेळू शकला नाही तर ईशान किशनशिवाय टीम इंडियाला पर्याय नाही.
गोलंदाजीत बदल होणार?
फलंदाजी एक बदल वगळता फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तर गोलंदाजीत दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराने 39 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. पण दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्द शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शार्दुल ठाकूरलाही बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनला वगळत टीम इंजियात शार्दुल ठाकूरलला संधी देण्यात आली. टीम इंडियाच्या या निर्णयावर क्रिकेटचाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ऑस्टेलियाविरुद्धच्या सामन्यात अश्विनने 10 षटकांमध्ये केवळ 34 धावा देत एक विकेट घेतली होती. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीही अश्विनला वगळण्यात आल्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरऐवजी आर अश्विनची प्लेईंग इलेव्हनमध्य पुन्हा एन्ट्री होऊ शकते.
शमीची एन्ट्री होणार
प्लेईंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचा बदल ठरणार आहे तो मोहम्मद शमीचा. नरेंद्र मोदी स्टेडिअम हे मोहम्मद शमीचं होमग्राऊंड आहे. आयपीएलमध्ये शमी गुजरात टायटन्सकडून खेळत होता, मोदी स्टेडिअमवर शमीची कामगिरी दमदार आहे. आयपीएल 2023 मध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या. यात नरेंद्र मोदी मोदी स्टेडिअममध्ये त्याने सर्वाधिक 17 विकेट घेतल्या. त्यामुळे शमीसाठी हे मैदान लकी आहे.
पाकिस्तान संघात बदल नाही?
टीम इंडियाप्रमाणेच पाकिस्तान संघही विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने 345 धावांचं आव्हान पार करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार नाही.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी/ रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेवन
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफरीदी, हारिस रऊफ.