विश्वचषक 2023 मध्ये चौकार-षटकारांची बरसात, 48 वर्षांचा रेकॉर्ड तुटला.. या खेळाडूच्या नावे सर्वाधिक षटकार
World Cup 2023: भारतात आयोजित करण्यात आलेली आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडलीय. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेलेत. गेल्या 12 विश्वचषकांच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे.
World Cup 2023 Record : आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा तेरावा हंगाम नुकताच संपला आहे. यंदाच्या विश्वचषकात अनेक विक्रम रचले गेलेत. विशेषत: फलंदाजांसाठी ही स्पर्धा जास्त खास ठरलीय. विश्विचषकाच्या इतिसात सर्वाधिक चौकर (Four) आणि षटकारांची (Six) बरसात यंदाच्या विश्वचषकात पाहिला मिळाली. 1975 साली सुरु झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा 13 वा हंगाम यंदा भारतात खेळवण्यात आली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच चॅम्पियन (Australia Win World Cup) ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताचा (India) पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या पराभवाने करोडे भारतीय चाहत्यांचं स्वप्न भंगलं. पण यंदाच्या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन झालं. चौकार, षटकार आणि शतकांचा विक्रम यंदाच्या स्पर्धेत झाला.
सर्वाधिक षटकरांचा विक्रम
भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 644 षटकारांची नोंद झाली आहे. गेल्या 12 विश्वचषक स्पर्धांमधला हा विक्रम आहे. याआधी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 463 षटकार लगावण्यात आले होते. हा एक विक्रम होता. पण यावेळी हा विक्रम मोडीत निघाला फंलदांनी गेल्यावेळेपेक्षा तब्बल 181 षटकार जास्त मारले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावलेत. रोहितने विश्वचषकात खेळलेल्या 11 सामन्यात तब्बल 31 षटकार ठोकले आहेत.
सर्वाधिक चौकारांचा विक्रम
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तब्बल 2239 चौकारांची नोंद झाली आहे. यातही भारताचे फलंदाज अव्वल आहेत. विराट कोहलीने 11 सामन्यात तब्बल 68 चौकार लगावलेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 11 सामन्यात 66 चौकार ठोकलेत. क्विंटन डीकॉकने 57 तर रचिन रविंद्रने 55 चौकार लगावलेत. तब्बल आठ फलंदाजानी पन्नासहून अधिक चौकार मारलेत.
शतकांचा विक्रम
याशिवाय यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शतकांचाही पाऊस पडलाय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 40 शतकं लगावली गेलीत. गेल्या 12 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातिल ही सर्वाधिक शतकं आहेत. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 4 शतकं लगावली. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 3 शतकं लगावत सर्वाधिक धावांचीही नोंद केलीय. याशिवाय न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रनेही 3 शतकं लगावली. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने स्पर्धेत सर्वोत्तम धावसंख्या केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची विक्रमी खेळ केली.
विराटची स्पर्धेत सर्वोत्तम धावसंख्या
विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधित धावा केल्या आहेत. विराटने 11 सामन्यात 95.62 च्या रनरेटने 765 धावा केल्या. यात तीन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकातील ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. कोहली प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचाही मानकरी ठरला.