Team India Mission World Cup : भारतात येत्या  5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) खेळवली जाणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या (England vs New Zealand) सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India) 'मिशन वर्ल्ड कप'ला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच टीम इंडिया मोठा धक्का बसला आहे. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणारा टीम इंडियाचा दुसरा सराव सामनाही रद्द झाला आहे. पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोनही सराव सामने रद्
केरळच्या तिरुवनंतपुरमध्ये भारत आणि नेदरलँडदरम्यान सराव सामना खेळवला जाणार होता. पण सकाळपासून केरळमध्ये पावसाचं वातावरण होतं. त्यामुळे सामना उशीराने सुरु होईलं असं सांगितलं गेलं. पण दुपारनतंरही पाऊस पडत असल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी गुवाहाटीतला इंग्लंडविरुद्धचा सराव सामना रद्द झाला होता. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिाला हे दोनही सराव सामने महत्त्वाचे होते. पण आता सराव सामने रद्द झाल्याने टीम इंडिआ थेट 8 तारखेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. 


टीम इंडियाचे सामने
टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. 8 ऑक्टोबरला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरला टीम इंडिया अफगाणीस्तानला भिडेल. तर 14 ऑक्टोबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर दोन हात करेल. 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशविलरुद्ध,  22 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध धरमशालात. 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध, 2 नोव्हेंबरला मुंबईत क्लालीफायर टीम, 5 नोव्हेंबरला कोलकातात दक्षिण आफ्रिका आणि 11 नोव्हेंबरला बंगळुरुत क्वालीफायर संघाबरोबर भारताचे सामने होतील. 


सुर्यकुमार की श्रेयस अय्यर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर दोघंही जबरदस्त फॉर्मात होते. दुसरीकडे विकेटकीपर म्हणून ईशान किशन आणि केएल राहुलमध्ये स्पर्धा आहे. 


वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, ईशान किशन, केएल राहुल, शार्दुल ठाकुर, रवींद जडेजा, कुलदीप यादव, आर अश्विन, सिराज, बुमराह, शमी.


संभाव्य प्लेइंग 11- रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, सिराज, शमी, जसप्रीत बुमराह.