ICC World Cup India vs New Zealand : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने सलग चार सामने जिंकेल आहेत, आणि सेमीफायनलमध्ये (World Cup Semifinal) धडक मारण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. चौथ्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. सामन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शुभमन गिल  (Shubman Gill) कर्णधार रोहित शर्माला काही प्रश्न विचारताना दिसतोय. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिलच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर
पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात बांगलादेशने  256 धावा केल्या. याला उत्तर देताना टीम इंडियाने विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर 7 विकटेने विजय मिळवला. या सामन्या विराटने शतक तर शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. रोहित 48 धावांवर बाद झाला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित आऊट झाला. यावरच शुभमन गिलने रोहित शर्माला प्रश्न विचारला. बाद झाल्यावर राग आला का असा प्रश्न गिलने रोहितला विचारला, यावर रोहितने षटकारच मारायचा होता, पण चेंडू खाली राहिला असं उत्तर दिलं.


न्यूझीलंडविरुद्ध जिंकणार का?
टीम इंडियाचा पुढचा सामना बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यावरही शुभमनने प्रश्न विचारला. 2003 नंतर टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेली नाही, यावेळी आपला विजय पक्का आहे का? असा प्रश्न विचारला. यावर रोहितने दिलेलं उत्तर खेळभावनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या स्पर्धेत टीम इंडिया जिंकलेली नाही हे खरं असलं तरी यावेळी आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करु, जिंकणार असा फाजील आत्मविश्वास बाळगून आम्ही क्रिकेट खेळत नाही. मैदानात उतरेल्यावर टीम म्हणून जे करणं शक्य आहे ते करु असं उत्तर रोहित शर्माने दिलं.


बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर
शुभमन गिलचा हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडित शुभमन संघातील इतर खेळाडूंनाही प्रश्न विचारताना दिसत आहे. केवळ रोहितच नाही तर शुभमनने हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनलाही प्रश्न विचारले. यात शुभमनने सिराजची चांगलीच फिरकी घेतली. शुभमनने सिराजला त्याच्या हैदराबादी लहेजात प्रश्न विषारला.  आजकाल विकेट घेतल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनमध्ये आक्रमकता दिसत नाही? यावर सिराजनेही जशात तसं उत्तर दिलं. माझ्या गोलंदाजीवेळी तू स्लिपमध्ये सपोर्ट करत नाही म्हणून आक्रमकता दाखवत नाही असं सिराजने म्हटलंय.



बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच पसंती पडलाय. लाखो क्रिकेट चाहत्यांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय.