ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या सेमीफायनलचं (World Cup Semifinal) चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघाची एन्ट्रीही जवळपास निश्चित झालीय. पण चौथ्या स्थानासाठी अजूनही पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan) शर्यतीत आहे. पण पाकिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल तर एखादा चमत्कार करावा लागेल. अकरा नोव्हेंबरला पाकिस्तानचा सामना इंग्लंडविरुद्ध (Pakistan vs England) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा लीगमधला शेवटचा सामना आहे. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पण पाकिस्तानला अजूनही एक संधी आहे. पण यासाठी त्यांना इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचं सेमीफायनलमधलं स्थान पक्कं
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार वासिम अक्रमने (Wasim Akram) संघाला एक फॉर्म्युला दिला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ सहज सेमीफायनल गाठू शकेल. वास्तविक पाकिस्तान संघाला सेमीफायनल गाठणं जवळपास अशक्य आहे. न्यूझीलंडचा रनरेट पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 24 व्या षटकातच पाच विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सेमीफायनलमधलं स्थान भक्कम केलं. 


पाकिस्तानसाठी अवघड शर्यत
न्यूझीलंडने नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला. यामुळे त्यांच्या खात्यात 10 पॉईंट जमा आहेत. तर न्यूझीलंडचा रनरेटही + 0.743 इतका आहे. दुसरीकडे पाकिस्तानही चौथ्या क्रमांकावर आहे. पण त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी आहे. पाकिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल तर इंग्लंडला शेवटच्या सामन्यात तब्बल 287 धावांनी हरवावं लागणार आहे. तर इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेत पाकिस्तानसमोर विजयाचं आव्हान ठेवलं तर पाकिस्तान ते धावांचं आव्हान  2.3  पूर्ण करावं लागणार आहे. हे जवळपास अशक्य आहे. यावर वसीम अक्रमने पाकिस्तान संघाला एक घातक फॉर्म्युला दिला आहे. 


वसीम अक्रमचा घातक फॉर्म्युला
वसीम अक्रम याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानवर खोचक टीका केली आहे. पाकिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल तर पहिली फलंदाजी करत 500 धावा कराव्या लागतील. त्यानंतर संपूर्ण इंग्लंड संघाला वीस मिनिटांसाठी ड्रेसिंग रुममध्ये बंद करायचं. म्हणजे इंग्लंडचे सर्व खेळाडू एकाच वेळी टाईम आऊट पद्धतीने बाद होतील. पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील कामगिरीवर वसीम अक्रमने जोरदार टीका केली आहे.