ICC World Cup 2023 Pakistan vs Afghanistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 23 ऑक्टोबर ही तारीख अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) सुवर्ण अक्षराने नोंदवली जाईल. अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानचा (Pakistan) तब्बल आठ विकटने पराभव केला. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत सात विकेट गमावत 282 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान अफगाणिस्तानने 49 व्या षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयानंतर अफगाणिस्तान खेळाडूंनी मैदानातच जल्लोष केला. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांचा डान्स करतानाचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या विजयामागचा सूत्रधार
अफगाणिस्तानच्या विजयाने अफगाणी खेळाडूं जितका आनंद झाला, तितकाच आनंद एका भारतीय खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसत होता. 90 च्या दशकात भारतीय क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू अफगाणिस्तानच्या  विजयाचा खरा सूत्रधार ठरलाय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सातवेळा आमने सामने आलेत. पण अफगाणिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नव्हता. पण हा भारतीय खेळाडू अफगाणिस्तान संघात दाखल झाला आणि संघाचं चित्रच पाटलंट. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर आणि तेही विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत मात केली. 


अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा केवळ योगायोग नव्हता. तर अफगाणिस्तान खेळाडूंची जिद्द, मेहनत आणि त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाचा होता. पाकिस्तानच्या आधी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला होता. अफगाणिस्तानच्या विजयमागे प्रमुख सूत्रधार आहे तो भारताचा स्टार फलंदाज अजय जडेजा (Ajay Jadeja). विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने अजय जडेजाची मेंटोर म्हणून नियुक्ती केली आणि अफगाणी संघाचा चेहरा-मोहराच बदलला. जडेजाने अफगाणी खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द पेटवली. संघाची रणनिती बनवण्यात अजय जडेजाची मुख्य भूमिका ठरतेय.



अजय जडेजाची क्रिकेट कारकिर्द


90 दशकात टीम इंडियाचा फिनिशर आणि बेस्ट फिल्डर अशी अजय जडेजाची ओळख होती. 1992 मध्ये अॅलन बॉर्डरचा अफलातून कॅच पकडत अजय जडेजा चर्चेत आला. क्षेत्ररक्षणात करताना त्याच्यात प्रचंड चपळाई होती. विशेषत: स्लीपमध्ये त्याच्या हातातून क्वचितच कॅच सुटेल. मधल्या फळीत तो टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज होता. एका सामन्यात शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 3 धावांची गरज होती. कर्णधार अजय जडेजाने स्वत: गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या आणइ हा सामना टीम इंडियाला जिंकून दिला. 


रॉबिन उत्थप्पा आणि मोहम्मद अझरुद्दीनबरोबर त्याने अनेक मॅचविनिंग खेळी केल्यात. पण मॅच फिक्सिंगचं ग्रहण लागलं आणि त्याची क्रिकेट कारकिर्दी संपुष्टात आली.