Afghanistan Team At Pathan's House: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तान संघाने (Afghanistan) भारतीय क्रिकेट संघाचे  (Team India) माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत इरफान पठाण अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर राशिद खानची गळाभेट घेताना दिसतोय. तसंच युसूफ पठाण आणि राशीदही गळाभेट घेताना दिसतायत. इरफान आणि युसूफ पठाणने अफगाणिस्तान संघाला दावतसाठी आमंत्रित केलं होतं. या आमंत्रणाचा स्विकार करत संपूर्ण अफगाणिस्ता संघाने पठाण बंधुंच्या गुजरातमधल्या घराला भेट दिली. यावेळेच काही फोटोही सोशल मीडिआवर व्हायरल झाले आहेत. यात इरफान पठाण, युसूफ पठाण आणि त्यांचे वडिल तसंच संपूर्ण अफगाणिस्तानचा संघ दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या विजयानंतर इरफानचा डान्स
अफगाणिस्तानने श्रीलंकेचा धुव्वा उडवत शानदार विजय मिळवला होता. या विजयानंतर इरफान पठाणने अफगाणिस्तान संघाला मैदानावरच डान्स करत शुभेच्छा दिल्या होत्या. इतकंच नाही तर इरफानने राशिद खानच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर राशिद खान आणि इरफान पठाणमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीखातरच इरफानने राशिद खान आणि अफगाणिस्तानच्या संघाला जेवणाचं निमंत्रण दिलं. 



अफगाणिस्तानला सेमीफायलची संधी?
आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामना सेमीफायनलच्या दृष्टीने महत्तवाचा ठरतोय. पहिल्या तीन स्थानांसाठी तीन संघ जवपास निश्चत झालेत. पहिल्या स्थानावर भारत, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण चौथ्या जागेसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन संघांमध्ये जबरदस्त चुरस आहे. अफगाणिस्तानने आठ सामन्यात चार विजय मिळवत आपली सेमीफायनलची शर्यत कायम ठेवली आहे. गेल्या सामन्यात मॅक्सवेलच्या एकाकी खेळीने अफगाणिस्तानचा पराभव केला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर ढकलला गेला आहे.