मुंबई : वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे नाराज अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रायुडूला टीममध्ये राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. टीम इंडियातील शिखर धवन आणि विजय शंकर या दोघांना दुखापतीमुळे मुकावे लागले. यानंतर देखील रायुडूला संधी मिळाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाराज असलेल्या रायुडूला एका देशाने आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. आईसलँड क्रिकेटने ही ऑफर रायुडूला दिली आहे. आईसलँडने आपल्या ट्विटर खात्यावरुन रायुडूला आपल्या देशात बोलावलं आहे. या ट्वीटमध्ये देशाच्या नागरिकत्वासाठीच्या अटी आणि नियमांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.


पण हे ट्वीट किती गांभीर्याने केले आहे, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे. कारण याआधीही आईसलँड क्रिकेटने अनेकदा गंमतीदार ट्वीट केले होते.


ट्वीटमध्ये काय म्हणाले आईसलँड क्रिकेट



''रायुडूने त्याचा 3D ग्लास आता बाजूला ठेवायला हव्या. आमच्या अटीचे दस्ताऐवज साधारण चष्म्याने वाचता येतील. आमच्या टीमकडून खेळ,' या आशयाचे ट्वीट आइसलँड क्रिकेटने केले आहे.


वर्ल्ड कपसाठी जेव्हा टीम इंडियाची निवड झाली तेव्हा अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली. विजय शंकर हा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्हींमध्ये योगदान देऊ शकतो. शंकरच्या या 3D भूमिकेमुळे त्याला संधी दिल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. यानंतर अंबाती रायुडूने ट्विटरवरून निशाणा साधला. हा वर्ल्ड कप मी 3D चष्मा घालून बघणार, असं ट्विट अंबाती रायुडूने केलं होतं.