IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सिजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार असून यात आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद न पटकावलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) टीम आपल्या संघाची पुनर्रबांधणी करण्याचा प्रयत्न करेल. येत्या मेगा ऑक्शनसाठी आरसीबीने कोणत्या खेळाडूंवर डाव लावून त्यांना खरेदी करावे याबाबत सल्ला आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सने दिला आहे. एबी डिविलियर्सने (AB de Villiers) अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट जगतात 360 डिग्री बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्सने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हंटले की, 'आरसीबीला अशा गोलंदाजांची गरज आहे जे चिन्नस्वामी स्टेडियमच्या पीचला चांगलं ओळखतात. जे या मैदानावर प्लॅनिंग करून गोलंदाजी करतात आणि टीम मॅनेजमेंटद्वारे बनवलेल्या रणनीती अंमलात आणू शकतील. आरसीबीने ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमार, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या 4 खेळाडूंना नक्की आपल्या संघात घ्यायला हवे. त्यानंतर पर्समध्ये किती रक्कम शिल्लक आहे हे तपासून खेळाडूंचे सिलेक्शन करावे लागेल. 


हेही वाचा : BCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी


 


आरसीबीची गोलंदाजी आहे कमकुवत : 


आयपीएलमध्ये आरसीबीचा इतिहासात पाहिला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी नेहमी मजबूत असते मात्र त्यातुलनेत गोलंदाजी मात्र कमकुवत ठरते. कदाचित हेच कारण आहे की  डिविलियर्सने यावेळी आरसीबीच्या मॅनेजमेंटला गोलंदाजीची कमी भरून काढण्यासाठी 4 स्टार गोलंदाजांना आपल्या संघात घेण्याचा सल्ला दिला असेल. डिविलियर्सने सुचवलेले 4 खेळाडू जर आरसीबीमध्ये आले तर आरसीबीची गोलंदाजीची बाजू नक्कीच मजबूत होईल. 


हेही वाचा : रिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?


आरसीबीने तीन खेळाडूंना केलं रिटेन : 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचायझीने 31 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये केवळ ३ खेळाडूंचा समावेश केला आहे. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. आता आरसीबीकडे ऑक्शनसाठी 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यूएईमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन होऊ शकतं.