नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट टीमचा सलामी बॅटसमन आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी राहिलेल्या इमाम उल हक याच्यावर एकाच वेळी अनेक महिलांसोबत संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आलेत. अनेक तरुणींसोबत चॅटिंग करत त्यांची दिशाभूल करणारे अनेक स्क्रिनशॉटस सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर इमाम उल हकनं आपल्यावरचे सगळे आरोप स्वीकार केलेत. इतकंच नाही तर त्यानं या ऑनलाईन स्कॅन्डलसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) माफीदेखील मागितलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक तरुणींनी इमामनं त्यांच्यासोबत केलेल्या चॅटिंगचे फोटो सोशल मीडियावरून सगळ्या जगासमोर उघड केले होते. महिलांची दिशाभूल करणं आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हे आरोप इमामवर आहेत. 
 


इमाम उल हक वादात

इमाम हा पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंझमाम उल हक याचा भाचा आहे. ही प्रकरणं समोर आल्यानंतर हे इमामचं खासगी प्रकरण असल्याचं सांगत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सोमवारी पीसीबीचे मॅनेजिंग डायरेक्टर वसीम खान यांनी, या प्रकरणाबद्दल इमाम उल हकनं आपली चूक मान्य करत माफी मागितल्याचं सांगितलंय.
 
सर्व क्रिकटर्सनं नैतिकता पाळत नियमांमध्ये राहण्याचा सल्ला यानंतर पीसीबीनं दिलाय. अशा पद्धतीचे आणखी प्रकरणं भविष्यात पाहायला मिळणार नाहीत, अशीही आशा पीसीबीनं व्यक्त केलीय.