`भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...`, पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...
Imran Khan Message for pakistan cricket : पाकिस्तानची माजी कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पत्राद्वारे पाकिस्तान क्रिकेटवर भाष्य केलं आहे.
PAK vs BAN 2nd Test : भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटला घरघर लागल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानला एकही सिरीज जिंकता आली नाही. तर बांगलादेशने पाकिस्तानवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशचा पाकिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेला पहिला विजय ठरला. बांगलादेशकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानवर सर्वबाजूने टीका होताना दिसत आहे. अशातच आता पाकिस्तानची माजी वर्ल्ड कप विनर कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पाकिस्तान क्रिकेटवर टीका केली आहे.
इम्रान खान काय म्हणाला?
खरं तर पाकिस्तानमध्ये क्रिकेट आवडीने पाहिलं जातं. पण इथल्या ताकदवान लोकांनी क्रिकेटला बर्बाद केलं आहे. या खेळावर नियंत्रण ठेवण्यासाठी बलवान लोकांनी आपल्या लोकांना तिथं बसवलं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेटला वाईट दिवस आले. पहिल्यांदाच असं घडलंय की पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमध्ये पहिल्या आठमध्ये जागा मिळवू शकला नाही. हे दुर्दैवी आहे. आपण बांगलादेशकडून देखील पराभूत झालोय. 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये याच संघाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता, याची आठवण देखील इम्रान खानने करून दिलीये.
पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीला संपूर्णपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कारणीभूत आहे. आपण बांगलादेशला 10 विकेट्सने का हरलो? या सर्व कोसळण्याचा दोष एका संस्थेवर येतो, असं इम्रान खान म्हणाले. त्यावेळी त्यांनी नक्वी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मोहसीन नक्वी यांच्याकडे पत्नीच्या नावावर दुबईमध्ये पाच दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता आहे, असं इम्रान खान म्हणाले.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची टीम : शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अबरार अहमद, अब्दुला शफीक, बाबर आझम, कामरान घुलाम, खर्राम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेर्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.
दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा, खालेद अहमद, नईम हसन, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम.