मुंबई : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची (Team India) सोमवारी 12 सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. या संघात अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही. यामध्ये प्रामुख्याने विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनकडे (Sanju Samson) दुर्लक्ष करण्यात आलं.  त्यामुळे संजू समर्थकांनी बीसीसीआय (Bcci) आणि निवड समितीवर नाराजी व्यक्त केली. मात्र आता त्याच संजूला गुडन्यूज मिळाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही गोड बातमी दिली आहे. (ind a vs nz a  bcci give big decision sanju samson lead team india a against new zealand a odi series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसनची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली नाही. मात्र बीसीसीआयने सॅमसनवर विश्वास ठेवत टीम इंडिया ए टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. टीम इंडिया ए न्यूझीलंड ए विरुद्ध वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत संजू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 



इंडिया-ए स्क्वॉड  : संजू सैमसन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, नवदीप सैनी आणि राजअंगद बावा.