नवी दिल्ली:  भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून धर्म आहे, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी आला. भारतीय संघाला बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. साहजिकच यामुळे लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हदय तुटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, बिहार आणि कोलकाता येथे हा धक्का पचवू न शकल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापैकी पहिली घटना ही बिहारच्या किशनगंज येथे घडली. याठिकाणी भारत-न्यूझीलंड सामना सुरु असताना अशोक पासवान या व्यक्तीला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. यानंतर अशोक पासवान यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती 'खबर सिमांचल' या फेसबुक पेजच्या वार्ताहराने दिली आहे. यामध्ये म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीच्या पडझडीनंतर भारतीय फलंदाजांनी डाव सावरत धावा करायला सुरुवात केली होती. 


त्याचा आनंद साजरा करण्यासाठी अशोक पासवान फटाके फोडत होते. मात्र, रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी तंबूत परतल्यानंतर भारत हा सामना हारणार असे दिसू लागले. तेव्हा अशोक पासवान यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचे 'खबर सिमांचल'च्या वृत्तात म्हटले आहे.


INDvNZ: टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया


तर दुसरी घटना ही कोलकाता येथे घडली. याठिकाणी श्रीकांता मैती या सायकल दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. श्रीकांता मैती आपल्या मोबाईल फोनवर भारत-न्यूझीलंडचा सामना पाहत होते. यावेळी महेंद्रसिंग धोनी बाद झाल्यानंतर मैती यांना हदयविकाराचा झटका आला. स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच श्रीकांता मैती यांचा मृत्यू झाला होता. 


Ind vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी म्हणतात....