मुंबई : Ind vs SL तीन टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. क्रिकबझने ही माहिती दिली आहे. (Mayank Agarwal Replaces Injured Ruturaj Gaikwad For Remaining Games)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने 62 धावांनी जिंकला होता. मालिकेतील दुसरा सामना 26 आणि तिसरा सामना 27 फेब्रुवारीला होणार आहे. दुसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी ही बातमी समोर आली आहे.


दुखापतीमुळे गायकवाड बाहेर


श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 मध्ये ऋतुराजची संघात निवड झाली नव्हती. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माहिती दिली की, 'ऋतुराज गायकवाडने सामन्यापूर्वी उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे मालिकेतील पहिला टी-20 सामना तो खेळू शकणार नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करत आहे.'


बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) सामन्याच्या एक दिवस आधी संघात सामील होण्यासाठी अल्प सूचनेवर तयार होता. त्याला या मालिकेसाठी धर्मशाला येथे पाठवण्यात आले आहे. मालिकेतील दोन्ही सामने येथे होणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ सध्या चंदीगडमध्ये क्वारंटाईन आहे. त्यात मयंकही होता. या कारणास्तव त्याचा बायोबबलमधूनच संघात समाविष्ट करण्यात आला. तो चंदीगडला उपस्थित होता, त्यामुळे धर्मशाळेला लवकर पोहोचला.


ऋतुराज गायकवाडने भारतीय संघासाठी आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 13 च्या सरासरीने केवळ 39 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 21 धावा आहे. ऋतुराज गायकवाड अजूनही भारतीय वनडे आणि कसोटी संघात पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात त्याने सर्वाधिक 635 ​​धावा केल्या होत्या. यावेळी चेन्नई संघाने त्याला कायम ठेवले आहे.