Rahul Dravid On Virat Kohli : येत्या 11 जानेवारीपासून भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG T20I) यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात असतानाच आता टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत (Rahul Dravid Press Conference) मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नाही, अशी माहिती भारताच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीसाठी येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशान किशनने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि तो अफगाणिस्तान टी-ट्वेंटी मालिकेसाठी सिलेक्शनसाठी अनुपलब्ध होता, अशी माहिती राहुल द्रविड यांनी दिली आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर अनेक फलंदाजांमुळे खेळू शकला नाही. त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही, असंही द्रविड म्हणाले आहेत.


अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे 14 महिन्यांच्या अंतरानंतर टी-20 मध्ये पुनरागमन होणार आहे. अफगाणिस्तान मालिका 11 जानेवारीपासून मोहालीत सुरू होत आहे. दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये तर अंतिम सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.


अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.


भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 


इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.


भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक


पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली
दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर
तिसरा T20- १७ जानेवारी- बंगळुरू