IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना (India vs Australia T20I) मंगळवारी मोहालीच्या (Mohali) PCA IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेसह भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी देखील करत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) आपल्या संघाचे अभिनंदन केले. मात्र वॉर्नरने शुभेच्छा देताना एक चूक केली आणि ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरने आपल्या संघाला शुभेच्छा देताना मोठी चूक केली आणि त्यानंतर आता चाहते त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. डेव्हिड वॉर्नरने (david warner) आपल्या इंस्टाग्रामवर ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरोन फिंच (Aaron Finch) आणि भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचा फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये  “आज कोण जिंकणार आहे? कम ऑन ऑस्ट्रेलिया," असं म्हटलं.


वॉर्नरच्या या पोस्टवर कमेंट करताना एका भारतीय चाहत्याने लिहिलं की, भाऊ रोहित (Rohit Sharma) कर्णधार आहे, विराट नाही. चाहत्याच्या या कमेंटनंतर वॉर्नरने त्याची माफीही मागितली. चाहत्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाने म्हटलं की, मला माहीत आहे. माफ करा.



या सामन्यात सर्वांच्या नजरा आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-2- आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीवर (Virat Kohli) होत्या. मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. विराटने फक्त 2 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) फारशी चांगली कामगिरी करु शकला आहे. रोहित 11 धावांवर माघारी परतला.


पहिल्या डावात भारतीय संघाने 208 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा हार्दिक पांड्याने (hardik pandya) केल्या. तर के एल राहुलने (kl rahul) देखील 35 बॉलमध्ये धुंवाधार फलंदाजी 55 धावा केल्या. त्य़ाचबरोबर सुर्यकुमार यादवने देखील 4 षटकांच्या जोरावर 46 धावांची खेळी केली.


दरम्यान, वॉर्नरला या मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो भारत दौऱ्यावर नाही. दरम्यान दोन्ही संघांमधला दुसरा टी-20 सामना 23 रोजी आणि त्यानंतर तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.