मोहाली : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे मोहालीत करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) बॅटिंगसाठी भाग पाडलंय. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टार बॉलरचं तब्बल 3 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर कमबॅक झालंय. (ind vs aus 1st t20i team india faster bowler umesh yadav play match after more than 3 years against australia at is bindra stadium mohali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियात उमेश यादवचं कमबॅक झालंय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानिमित्ताने उमेश तब्बल टी 20 फॉर्मेटमध्ये 3 वर्षांनी मैदानात उतरणार आहे. उमेशने अखेरचा टी 20 सामना 24 फेब्रुवारी 2019 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. उमेशचा टीम इंडियात मोहम्मद शमीच्या जागी समावेश करण्यात आला आहे. 


मोहम्मद शमीला या टी 20 सीरिजच्या अवघ्या काही दिवसांआधी कोरोनाची लागण झालेली. त्यामुळे शमीच्या जागी उमेश यादवला संधी देण्यात आली. त्यामुळे आता उमेश यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


ऑस्ट्रेलिया  प्लेइंग इलेव्हन :  एरॉन फिंच (कॅप्टन), कॅमरन ग्रीन, जॉश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हीड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, एश्टन ऐगर, जॉश हेजलवु़ड, एडम झॅम्पा आणि नाथन एलिस.