IND VS AUS 1st Test :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजचा पहिला सामना पार पडला. पर्थ येथे पार पडलेला पहिलाच टेस्ट सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या दिवशी टीम इंडियाची गडगडलेली खेळी पाहून चाहत्यांना चिंता वाटतं होती, त्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामन्यात उपस्थित नसल्याने टीम इंडियाच नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah)  होतं. रोहितच्या तुलनेत बुमराहला टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्याचा अनुभवही नव्हता. मात्र रोहितच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाला मोठं यश मिळाल्यानंतर बुमराह हाच रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा कर्णधार असणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थ टेस्टचा पहिला दिवस टीम इंडियासाठी फार अवघड ठरला. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून फलंदाजी निवडली असली तरी फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या माऱ्या समोर टीम इंडियाचे फलंदाज 150 धावांवरच ढेर झाले.  न्यूझीलंड विरुद्ध सीरिज गमावल्यावर ऑस्ट्रेलियामध्येही टीम इंडियाची शीच अवस्था होणार कि काय अशी चिंता भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया समोर उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांना अवघ्या 104 धावांवर ऑल आउट केले. यात कर्णधार जसप्रीत बुमराहने एकट्यानं 5 विकेट्स घेतल्या. 



टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं : 


रोहित शर्माच्या अनुपस्थिती जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान यशस्वीपणे सांभाळली. त्याच्या नेतृत्वात दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी 487 धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तब्बल 535 धावांचे आव्हान दिले. तर गोलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 295 धावांवर ऑल आउट करून पहिला टेस्ट सामनाही खिशात घातला. यावेळी देखील बुमराहने ओव्हरला योग्य गोलंदाजांना संधी दिली. यात बुमराहने 3, मोहम्मद सिराजने 3, हर्षित राणाने 1 तर वॉशिंग्टन सुंदरने 2 आणि नितेश रेड्डीने 1 विकेट घेतली. त्यामुळे भारताने विक्रमी धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. 


बुमराह रोहित शर्माचा उत्तराधिकारी? 


रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनल सामना लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पुढील 3 सामने जिंकेल तर ते फायनलमध्ये जातील. रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर टेस्टमध्ये आपली निवृत्ती घोषित करू शकतो. त्यानंतर भारताच्या टेस्ट संघाचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवलं जाऊ शकतं.  जसप्रीत बुमराहने यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात संघाचं नेतृत्वही केलं आहे. 


हेही वाचा : मॅच दरम्यान दिसली अकाय कोहलीची पहिली झलक, फॅन्स म्हणाले सेम टू सेम विराट, पाहा PHOTO


 


कसं असणार WTC फायनलचं समीकरण? 


टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची सीरिज गमावल्यामुळे WTC पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर असलेलया टीम इंडियाची नंबर 2 वर घसरण झाली होती. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया 62.50 च्या विजयाची टक्केवारीने नंबर 1 वर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार होते. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमधील पहिला सामना जिंकल्यामुळे टीम इंडियाला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी केवळ 3 सामने जिंकायचे आहेत. जर उर्वरित 3 सामने जिंकण्यात भारताला यश आलं नाही तर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. WTC फायनलची फायनल जून 2025 मध्ये लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.