मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध टीम इंडियाने (IND vs AUS 1st Test )  ने अतिशय निराशाजनक प्रदर्शन केलं. यामुळे भारतीय संघाचे चाहते धक्क्यात आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताच्या या अपयशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Virendra Sehwag) विरेंद्र सेहवाग आपल्या ट्विटमुळे कायमच चर्चेत असतो. भारतीय संघाच्या या कामगिरीवरही विरेंद्रने टिपण्णी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाची मजबूत फलंदाजी पँट कमिंस आणि जोश हेजलवुडच्या जलद गोलंदाजी जोडीसमोर टिकू शकले नाहीत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने सुरूवातीच्या दीड दिवसातंच आठ विकेट राखून विजय मिळविला. या सामन्यात भारताचा कोणताही फलंदाज दोन अंकी धावा करू शकला नाही. यावर भारताचा माजी सलामी फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) ने संघाची खिल्ली उडवली आहे. फलंदाजीच्या धावांचा उल्लेख करताना विरेंद्र सेहवागने ट्विट केलंय. 



विरू ट्विटमध्ये म्हणतो की,'विसरण्याचा ओटीपी आहे ४९२०४०८४०४१'. विरेंद्र कायमच आपल्या अनोख्या शैलीत ट्विट करत असतो. विरूचे ट्विट कायमच चर्चेत असतात. विरू कमी शब्दात अगदी मार्मिक बोलत असतो असं जाणकारांच म्हणण आहे. 


या अगोदरही विरूने एक ट्विट केलंय त्यामध्ये तो म्हणतो की, सरेंडर करने आया है.... (Surrender kar diye bilkul yaar) असं म्हणतं विरेंद्र आणखी एक ट्विट केलं आहे. 



ऑस्ट्रेलियाकडून (Australia) जोश हेझलवूडने (Josh Hazlewood)ने भारताच्या दुसर्‍या डावात कोणत्याही फलंदाजाला मैदानावर टीकू दिले नाही आणि त्याने अवघ्या ८ धावांत ५ बळी घेत मोठी कामगिरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १ विकेट घेतली होती.