IND vs AUS, 2nd T20 : नागपूरच्या होमग्राउंडमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूला डच्चू मिळणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS, 2nd T20) दुसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये ( Vidarbha Cricket Association Stadium) करण्यात आलं आहे.
नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS, 2nd T20) दुसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये ( Vidarbha Cricket Association Stadium) करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला होता. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने सहजासहजी हे टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (ind vs aus 2nd t20 team india may jasprit bumrah replced to umesh yadav in playing 11 at vidarbha cricket association stadium nagpur)
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे बुमराहची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होऊ शकते. बुमराहला उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संधी दिली जाऊ शकते. उमेशने पहिल्या टी 20 सामन्यात अवघ्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्याने 27 धावा लुटवलेल्या. यामुळे टीम मॅनेजमेंट उमेशला डच्चू देऊन त्याजागी बुमराहचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकते.
रोहित आणि उमेशचं होमग्राउंड
कॅप्टन रोहित शर्मा आणि उमेश यादव हे दोघेही नागपुरात जन्मलेले आहेत. त्यामुळे या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मात्र जर उमेशला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं, तर त्याच्या चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. यामुळे आता टीम मॅनेजमेंट उमेशला बसवणार की पुन्हा एक संधी देणार, याकडे सर्वाचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडियासाठी 'करो या मरो'
पहिला सामना गमावल्याने टीम इंडियासाठी हा दुसरा सामना करो या मरोचा आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वाचं टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.