IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात चौथा टेस्ट सामना खेळवला जात आहे. रविवारी टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची (Team India) एक विकेट शिल्लक असल्याने दिवसाच्या सुरुवातीला नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज हे दोघे मैदानात फलंदाजीसाठी उतरले. यावेळी सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिराजच्या (Mohammad Siraj) विकेटवरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हा मैदानातील अंपायरशी वाद घालताना दिसत आहे.


नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या फलंदाजीची पहिली इनिंग गुंडाळण्यासाठी पॅट कमिन्सने 119 व्या ओव्हरला मोहम्मद सिराजला फुल-लेंथ बॉल टाकला. ज्याला सिराजच्या बॅटची कट लागली आणि स्लिप होऊन तो मागे उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे जाऊन पोहोचली. यावेळी स्टीव्ह स्मिथने देखील कोणतीही चूक न करता सिराजचा कॅच पकडला. हे पाहून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला, पण मैदानावरील अंपायर मायकेल गॉफने तो बम्प बॉल होता की नाही हे ठरवण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे पोहोचवला. ऑस्ट्रेलियाची टीम निर्णय येण्यापूर्वीच जवळपास पॅव्हेलियनमध्ये पोहोचली होती तेवढ्यात थर्ड अंपायरचा निर्णय स्क्रीनवर आला. थर्ड अंपायरने रिप्ले पाहून मोहम्मद सिराजच्या विकेटचा निर्णय बदलला. थर्ड अंपायर शरफुद्दौलाने सिराजला नॉट आऊट देऊन 'मी बॉल मागच्या बाजूने आदळताना पाहू शकतो, मी समाधानी आहे' असा निर्णय दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आश्चर्यचकित झाला. 


पॅट कमिन्सने पुन्हा एकदा मैदानातील अंपायर मायकेल गफ यांच्याकडून पुन्हा फुटेज तपासण्याची विनंती करत डीआरएसची मागणी केली, परंतु अंपायर मायकेल गफ आणि जोएल विल्सन यांनी पॅट कमिन्सची ही अपील फेटाळली. ज्यामुळे सिराज आणि नितीशने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. यावेळी कर्णधार पॅट कमिन्स अंपायरशी वाद घालताना त्याला रिव्ह्यूवर वापरायचा होता, पण मैदानावरील अंपायर मायकेल गॉफ आणि जोएल विल्सन यांनी तसे करण्यास नकार दिला. हा वाद संपवून पुन्हा खेळाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनने टीम इंडियाचा फलंदाज नितीश रेड्डीला 119 ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ११४ धावांवर बाद केले. त्यामुळे फलंदाजीचा पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव 119.3 ओव्हरमध्ये 369 धावांवर आटोपला. 


 पाहा व्हिडीओ : 



भारतीय संघाची प्लेईंग 11 : 


यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप