IND VS AUS : जशाच तसे! विराटला चिडवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला, पाहा Video
IND VS AUS 4th Test : दुसरी इनिंग सुरु असताना फलंदाजीसाठी आलेल्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला बुमराहच्या बॉलिंगने गोंधळात टाकलं आणि बोल्ड केलं. बुमराहने कॉन्स्टासला आऊट केल्यानंतर मैदानात जे सेलिब्रेशन केलं सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजमधील चौथा सामना खेळवला जात आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दुसरी इनिंग सुरु असताना बुमराहने सॅम कॉन्स्टासची विकेट घेऊन बदल पूर्ण केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पहिली इनिंग 369 धावा करून गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया 105 धावांनी आघाडीवर होती. दुसरी इनिंग सुरु असताना फलंदाजीसाठी आलेल्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला बुमराहच्या बॉलिंगने गोंधळात टाकलं आणि बोल्ड केलं. बुमराहने कॉन्स्टासला आऊट केल्यानंतर मैदानात जे सेलिब्रेशन केलं सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी ऑस्ट्रेलियाकडून भारताला विजयासाठी मोठे आव्हान देण्याकरता ऑस्ट्रेलियाची टीम दुसऱ्या इनिंगच्या फलंदाजीसाठी मैदानात आली. यावेळी ओपनिंगसाठी 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजाची जोडी मैदानात उतरली. सहाव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने कॉन्स्टासला चकवले, तर दुसरा चेंडूही त्याने बाहेरच्या दिशेने टाकला पण तिसरा चेंडू इन-स्विंग होता जो कॉन्स्टसला चुकवला आणि त्याचे स्टंप उडाले. सॅम कॉन्स्टासनी पहिल्या दिवशी विराट सोबत मैदानात झालेल्या वादानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीची विकेट पडल्यावर मैदानात अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे रविवारी अवघ्या २० धावांवर कॉन्स्टसच्या रूपाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगची पहिली विकेट पडल्यावर बुमराहने त्याच स्टाईलने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन करून ऑस्ट्रेलियाला जशास तसे उत्तर दिले.
पाहा व्हिडीओ :
टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज :
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दुसरी विकेट घेतल्यावर टेस्ट फॉरमॅटमधील विकेट्सची डबलसेंच्युरी केली. जसप्रीत बुमराहपूर्वी देखील काही गोलंदाजांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेतले आहेत पण त्यापैकी कोणालाही 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणं शक्य झालं नव्हतं. बुमराहपूर्वी वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने 376 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 20.94 आहे.
भारतीय संघाची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप