IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना गुरुवार 26 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. मेलबर्न येथे होणारा सामना हा या सीरिजमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या तुलनेत लवकर सुरु होणार आहे. भारत - ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी मेलबर्न टेस्ट जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह दोन्ही देशातील क्रिकेट चाहते देखील हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असतील. तेव्हा सदर सामना कधी आणि कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेउयात.  


1-1 अशा बरोबरीत आहे सीरिज? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून यातील पर्थ येथे झालेला पहिला सामना हा भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तर गाबा येथे झालेला तिसरा सामना ड्रॉ झाला. सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. सध्या WTC Final चं समीकरण पाहिलं तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज जिंकावी लागेल. सध्या टेस्ट सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. परंतु जर टीम इंडियाने 3-1 अशा फरकाने ही सीरिज जिंकली तर ते थेट WTC फायनलसाठी क्वालिफाय होतील. पण जर हीच सीरिज 2-2 वर ड्रॉ झाली तर टीम इंडियाला दुसऱ्या संघांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहावं लागेल. 


किती वाजता सुरु होणार सामना? 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्टचा चौथा सामना हा 26 ते 30 डिसेंबर पर्यंत खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात असणाऱ्या वेगवेगळ्या टाईम झोनमुळे तेथील प्रत्येक शहरातील टाइम झोनमध्ये फरक असतो. सीरिजमधील पहिला सामना हा सकाळी 7.50 वाजता, एडिलेड डे-नाइट टेस्ट सकाळी 9:30 वाजता तर गाबा येथे झालेला तिसरा सामना हा 5:50 वाजता सुरु झाला होता. परंतु आता मेलबर्न येथील सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा बदलली आहे. 


हेही वाचा : विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती


मेलबर्न टेस्ट सेशन : 


सकाळचं सेशन : सकाळी 5 ते 7 वाजता 


दुपार सेशन : सकाळी 7.40 ते 9.40 वाजता 


संध्याकाळचं सेशन: सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता 


पहिल्या दिवशी सकाळी 4.30 वाजता दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये टॉस होईल. याव्यतिरिक्त, जर दिवसभरातील खेळात आवश्यक किमान 90 ओव्हर्स टाकले गेले नाहीत तर सामना दररोज 30 मिनिटांसाठी वाढवण्यात येईल. 


फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना : 


भारत - ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर दाखवण्यात येईल. तर  डिज्नी प्लस हॉटस्टार वेबसाइट आणि मोबाइल अँपवर लाईव्ह स्ट्रीम केलं जाईल. तसेच या सामन्याचं प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्सवर देखील करण्यात येईल. भारत - ऑस्ट्रेलिया चौथा सामना डीडी फ्री डिश असणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर फ्रीमध्ये पाहू शकतात.