चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
IND VS AUS : WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.
IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु असून यातील चौथा सामना हा 26 डिसेंबर पासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. सध्या ही सीरिज 1-1 अशा बरोबरीत असून WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला (Team India) उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.
रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये भारताचं दुसर ट्रेनिंग सेशन सुरु असताना कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. नेट्समध्ये फलंदाजी करताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. रोहित शर्मा थ्रोडाउन एक्स्पर्ट दया याच्या बॉलिंगचा सामना करत होते. दयाने टाकलेला बॉल रोहितच्या डाव्या गुडघ्याला लागला. त्यानंतर काहीवेळ रोहितने त्याचा सराव सुरु ठेवला. काहीवेळाने संघाचे फिजियो रोहित शर्माची तपासणी करण्यासाठी आले. रोहितला खुर्चीवर बसवून जिथे बॉल लागला त्या ठिकाणी आइस पॅक लावण्यात आला.
हेही वाचा : माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
वेदनेनं कळवळला रोहित शर्मा :
आइस पॅकने इजा झालेल्या ठिकाणी शेक देताना रोहित वेदनेने कळवळला. मग रोहितला आराम मिळावा म्हणून फिजियोने त्याचा डावा पाय खुर्चीवर ठेवला. रोहित शर्माची दुखापत तितकीशी गंभीर वाटत नव्हती. दुखापत झाल्याने पायाला सूज आली असली तरी ती लवकर कमी होईल असं संघाच्या फिजिओने सांगितलं. मात्र मेलबर्न टेस्टला 4 दिवस शिल्लक असताना रोहित शर्माला दुखापत झाल्याने चाहत्यांचा टेंशन वाढलं आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक :
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी
कुठे पाहता येणार सामना?
एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.