India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा T20 सामना खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाने (Team India) मालिका खिशात घातली आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत एकही टी-20 सामना गमावलेला नाही. त्यामुळे आता सूर्या अँड कंपनी अखेरच्या सामन्यात कांगारूंची कंबर तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल? सामन्यादरम्यान हवामानाची स्थिती काय असेल? यावर सविस्तर रिपोर्ट (IND vs AUS Pitch Report) पाहुया....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने एम. चिन्नास्वामी यांच्यात 6 सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघाला केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे, तर तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना ड्रॉ राहिला. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. स्पिनर्सला खेळपट्टीवर भरपूर सपोर्ट असला तरी मैदानाचा आकार लहान असल्याने मोठे फटके सहज मारले जातात. अखेरचा सामना उच्च स्कोअरिंग होईल अशी अपेक्षा आहे.


हवामान कसं असेल?


सामन्याच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी सामन्याच्या दिवशी बंगळुरूमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता 55 टक्के आहे. कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. त्यामुळे सामना पूर्णवेळ होईल, अशी शक्यता आहे.



आणखी वाचा - Mohammed Shami : जखमी असतानाही शमी वर्ल्ड कप खेळला? मुंबईतील डॉक्टरांचा धक्कादायक रिपोर्ट समोर!


भारत : यशस्वी जयस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), सूर्यकुमार यादव (C), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, दीपक चहर, आवेश खान.


ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, टिम डेव्हिड, अॅरॉन हार्डी, मॅथ्यू वेड (C), नॅथन एलिस, तन्वीर संघा, बेन द्वारशुइस, जेसन बेहरेंडॉफ.