India vs Australia World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा फायनल (IND vs AUS Final) सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचलेली टीम इंडिया यंदा तिसऱ्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकणार उचलणार का? असा सवाल विचारला जातोय. अहमदाबादच्या मैदानात खेळपट्टीवर सगळा खेळ असणार आहे. दोन्ही संघाचे पहिले तीन खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने सामना तगडा होणार हे नक्की... अशातच आता वर्ल्ड कप फायनलपूर्वी टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाले Ravi Shastri ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला वाटतं की, पहिले 10 ओव्हर खूप महत्त्वाचे असणार आहेत. भारताला चांगली सुरुवात झाली, विशेषतः रोहितने टॉप ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामुळे खूप फरक पडतो. तसंच ऑस्ट्रेलियालाही अशी सुरुवात झाली तर त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.


विराट ज्या फॉर्ममध्ये आहे, तो स्वतःची स्क्रिप्ट लिहितोय. त्याच्या बॅटने त्याने आणखी एक शतक झळकावलेलं पहायला मिळालं तर नवल वाटायला नको, असं म्हणत रवी शास्त्री यांनी विराटचं कौतूक केलंय. सेमीफायनलमध्ये विराटने जशी कामगिरी केलीये, ती वाखण्याजोगी आहे. मात्र, फायनलमध्ये देखील विराट चांगली कामगिरी करेल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.


Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? थेट क्रीडामंत्र्याला केलं चीफ सिलेक्टर!


दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :


ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.